Jitendra Shelke Accident: समृद्धी महामार्गावर कार थेट कंटेनरखाली घुसली; अशोक खरातच्या विश्वासू सहकाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात 'शिवनिका ट्रस्ट'चे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.

Jitendra Shelke Accident: समृद्धी महामार्गावर कार थेट कंटेनरखाली घुसली; अशोक खरातच्या विश्वासू सहकाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

Jitendra Shelke Accident:  समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. उभ्या असलेल्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत शेळके यांच्या कुटुंबातील सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत.

कंटेनरला कारची भीषण धडक; गाडीचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे प्रवास करत होते. धोत्रे गावाच्या शिवारात रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. कारचा वेग अधिक असल्याने चालकाला उभ्या कंटेनरचा अंदाज आला नाही आणि त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये शेळके यांनी जागीच प्राण गमावले.

कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात; बचावकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न
या अपघातात जितेंद्र शेळके यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, शेळके यांची पत्नी बराच वेळ कारच्या ढिगाऱ्यात अडकून पडली होती. प्रशासकीय पथकाने क्रेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दोघांचीही प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – ST Bus Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागला; 10 टक्के हंगामी भाडेवाढीसह आता प्रवाशांवर ‘या’ कराचाही बोजा

अशोक खरात यांच्या अटकेनंतर तणावात होते शेळके?
जितेंद्र शेळके हे वादग्रस्त ठरलेल्या अशोक खरात यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. खरात यांच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष होते, तसेच त्यांच्या व्यवसायात खरात यांची भागीदारी असल्याचीही चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात खरात यांना अटक झाल्यापासून शेळके हे मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे. याच तणावाच्या सावटात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number