रविवारी रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुणे-लोणावळा मार्गावर 4 लोकल बंद; कोणत्या एक्सप्रेसच्या वेळा बदलल्या?

Central Railway Block Update : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान विशेष कामासाठी रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेवांमध्ये बदल होणार असून, प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे. नेमका तपशील जाणून घ्या.

रविवारी रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुणे-लोणावळा मार्गावर 4 लोकल बंद; कोणत्या एक्सप्रेसच्या वेळा बदलल्या?
Pune Lonavala Local Train

पुणे-लोणावळा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पादचारी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्यामुळे देहूरोड आणि बेगडेवाडी या स्थानकांच्या दरम्यान आरएच गर्डर पद्दतीने आरसीसी बॉक्स बसवला जाणार आहे.

एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
या मार्गावरील तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने, 25 ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत चार तासांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या कारणामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार आहे.

हेही वाचा- मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडणार! रविवारी मेगाब्लॉक, अनेक फेऱ्या रद्द

‘या’ लोकल रद्द
रविवारी पुणे-लोणावळा या मार्गावरील 4 उपनगरीय लोकल पूर्णपणे रद्द राहणार आहेत.
1)99814 पुणे ते लोणावळा
2)99818 पुणे ते लोणावळा
3)99813 लोणावळा ते पुणे
4)99817 लोणावळा ते शिवाजीगर एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होईल.
5)12164 चेन्नई-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसला शनिवारी प्रवासादरम्यान सोलापूर किंवा पुणे या विभागात तब्बल 3 तास 30 मिनिटे थांबवून नियंत्रित केले जाणार आहे

तर 11029 मुंबई सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस ही रविवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटां ऐवजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी अर्थात साडेतीन तास उशिराने सुटेल. महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांनी प्रवासापूर्वी ‘NTES’ अॅप किंवा ‘enquiry.indianrail.gov.in’ यावर वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number