Mega Block: रविवारी मुंबईकरांचा खोळंबा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, ‘या’ तीन स्थानकांवर लोकल थांबणार नाही; अनेक फेऱ्या रद्द

रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mega Block: रविवारी मुंबईकरांचा खोळंबा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, ‘या’ तीन स्थानकांवर लोकल थांबणार नाही; अनेक फेऱ्या रद्द

मुंबईकरांसाठी रविवारी पुन्हा एकदा लोकल प्रवासात अडचणी निर्माण होणार आहेत. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर 24 मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्यांचे मार्ग बदलले जाणार असून काही सेवा रद्दही राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 दरम्यान सुटणाऱ्या डाउन स्लो मार्गावरील लोकल सेवा माटुंगा ते मुलुंड दरम्यान फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा स्लो मार्गावर आणल्या जातील. या बदलामुळे संबंधित लोकल सेवा सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील.

हेही वाचा: Sunetra Pawar : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर; सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी लागणार?

त्याचप्रमाणे ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 दरम्यान सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील गाड्याही मुलुंड ते माटुंगा दरम्यान फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना देखील काही निवडक स्थानकांवर थांबा देण्यात येणार असून त्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ब्लॉकच्या काळात विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या तीन स्थानकांवर अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील उपनगरी गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी प्रवासाची तयारी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या अनेक डाउन हार्बर सेवा रद्द राहतील. तसेच गोरेगाव आणि वांद्रे दिशेने धावणाऱ्या काही सेवांवरही परिणाम होणार आहे. पनवेल, बेलापूर, वाशी तसेच गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अनेक अप सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Pratap Sarnaik: '15 ऑगस्टनंतर वेळ देणार नाही! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य…'; आमदार प्रताप सरनाईकांचा कडक इशारा

ब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. या सेवा दर 20 मिनिटांनी उपलब्ध असतील. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 6  या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे ब्लॉक अत्यावश्यक आहेत. मात्र यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number