मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर 15 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वेने जारी केले आहे. हा ब्लॉक 28 आणि 29 ऑकस्ट 2026 च्या मध्यरात्रीपासून ते 11 आणि 12 सप्टेंबरच 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत (दररोज मध्यरात्री 5 ते 6 तास) घेतला जाणार आहे. तसेच 15 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटाचा विस्तार करण्याकरिता टिटवाळा येथे हा 15 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकच्या पहिल्या भागात 28 आणि 29 ऑगस्ट (शुक्रवार/शनिवारची रात्र) ते 1 आणि 2 सप्टेंबर (मंगळवार/बुधवारची रात्र) हा कालावधी असून मध्यरात्रीपर्यंतच्या या ब्लॉकमुळे त्याचा रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम होणार आहे. हा ब्लॉक रात्री 23.30 ते पहाटे 05.10 (प्रत्येक रात्री) या कालावधीत असणार आहे. तसेच कल्याण आणि वासिंद स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' ईशान्य दिशेकडे (सर्व क्रॉसओव्हर पॉइंट्स वगळून) हे ब्लॉकचे विभाग आहेत.
या ब्लॉकमुळे होणारे परिणाम
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे नियमन –
* गाडी क्रमांक 11048 गोरखपूर – दादर एक्सप्रेसचे दिनांक २८/२९.०८.२०२६ आणि दिनांक ०१/०२.०९.२०२६ रोजी वासिंद येथे, तसेच दिनांक ३०/३१.०८.२०२६ रोजी आटगाव येथे नियमन केले जाईल.
* गाडी क्रमांक 11044 बलिया – दादर एक्सप्रेसचे दिनांक २९/३०.०८.२०२६ रोजी आटगाव येथे आणि दिनांक ३१.०८.२०२६/०१.०९.२०२६ रोजी वासिंद येथे नियमन केले जाईल.
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना उशीर –
* गाडी क्रमांक 12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल आणि गाडी क्रमांक 15181 मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १० ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.
* उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या किंवा सुट्टीकालीन विशेष गाड्यांचे मार्ग बदलले जाऊ शकतात किंवा परिचालन आवश्यकतेनुसार त्यांचे नियमन केले जाऊ शकते.
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज
उपनगरीय सेवा रद्द करणे
ब्लॉक कालावधीत टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.
खालील उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील
दिनांक २८.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.००, २२.५० आणि २३.४२ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – टिटवाळा उपनगरी ट्रेन्स.
दिनांक २९.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०८ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरी ट्रेन.
दिनांक २८.०८.२०२६ रोजी टिटवाळा येथून २१.०० आणि २२.०६ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन्स.
दिनांक २८.०८.२०२६ रोजी टिटवाळा येथून २३.१४ वाजता सुटणारी टिटवाळा-ठाणे उपनगरी ट्रेन.
२८.०८.२०२६ रोजी आसनगाव येथून २३.०८ वाजता सुटणारी आसनगाव-ठाणे उपनगरी ट्रेन.
उपनगरीय सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन
दिनांक २८.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.५६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनगाव उपनगरी गाडी टिटवाळा येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.(आसनगावपर्यंत जाणार नाही).
दिनांक २८.०८.२०२६ रोजी डोंबिवली येथून २२.०० वाजता सुटणारी डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन आणि कल्याण येथून २२.०६ वाजता सुटणारी कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाणार नाही).
याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.