Wednesday, February 18, 2026 08:38:00 AM

Chandrapur Muncipal Corporation: चंद्रपूर काँग्रेसमध्ये 'ऑल इज वेल'; विभागीय आयुक्तांविरोधातील याचिका मागे, नेमकं काय घडलं?

विभागीय आयुक्तांविरोधातील याचिका मागे घेण्यात आली असून, पक्षांतर्गत समन्वयानंतर नेतृत्वाचा प्रश्नही निकाली निघाला आहे.

chandrapur muncipal corporation चंद्रपूर काँग्रेसमध्ये ऑल इज वेल  विभागीय आयुक्तांविरोधातील याचिका मागे नेमकं काय घडलं

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर आता पडदा पडताना दिसत आहे. विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका आता मागे घेण्यात आली असून, यामुळे निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कॉँग्रेसचे काही नगरसेवकांविरोधात विभागीय आयुक्तांनी आक्षेप नोंदवला होता. यामुळे विजय वडेट्टीवार यांनी याचिका दाखल केली होती. 

काँग्रेसच्या गट नोंदणी संदर्भात जी दिरंगाई होत आहे ती काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गट नोंदणी संदर्भात प्रशासनाकडून कुठलीही दिरंगाई किंवा दुर्लक्ष होत नसल्याची भूमिका विभागीय आयुक्त कार्यालयची आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी दिली आहे. 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात मतभेद समोर आले होते. या वादात धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर नगरसेवक लपवण्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले होते आणि त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. मात्र, पक्षांतर्गत चर्चा आणि समन्वयानंतर ही याचिका आता मागे घेण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद शमल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Aadhaar Deactivated: UIDAI ची मोठी कारवाई; देशातील 2.5 कोटी आधार क्रमांक कायमचे हटवले, 'या' एका कारणामुळे घेण्यात आला निर्णय

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत चंद्रपूर महानगरपालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी राजेश अडूर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे महानगरपालिकेतील नेतृत्वाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पक्ष पातळीवर गटनेता पदासह इतर सर्व मुद्द्यांवर एकमत झाले आहे. काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या एकसंध असून, अंतर्गत मतभेद चर्चेतून सोडवण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद आता संपुष्टात आला असून, चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे राजकारण पुन्हा एकसंघपणे पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: Navi Mumbai Mayor Election: भाजपचा 'वन मॅन शो'! नवी मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपद भाजपाच्याच ताब्यात


सम्बन्धित सामग्री