संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुंडेंचे आरोप

बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुंडेंचे आरोप

बीड : बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा. राजकीय हस्तक्षेपामुळे कृत्य करण्याचे आरोपीचे धाडस झाल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. अधिवेशनात एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावर संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.  

बीड जिल्ह्यात पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका भगिनीचा एक वर्षापासून हा छळ होत होता. पवार याने अनेक छोटे क्लासेस दबाव आणून बंद केले. गुन्हा दाखल झाला तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर त्यांच्यासोबत होते असा आरोप मुंडे यांनी केला आहे. तसेच हे पोलिस तपासात समोर येणे गरजेचे आहे असल्याचेही त्यांनी म्हटले. 

हेही वाचा: Ahilyanagar: आजोबांनी बिबट्याच्या तावडीतून मोठ्या धाडसाने वाचवला नातवाचा जीव

या प्रकाराची खूप दिवसापासून चर्चा होत होती. अनेक लोकांनी आपल्या अब्रू पोटी आवाज उठवला नाही. मी त्या पिडीत मुलीच्या वडिलांची भेट घेतली. त्यांची अवस्था पाहून मला सहन झाले नाही. इतक्या निच व्यक्तीला इथला आमदार शिव जयंतीचा अध्यक्ष करतो. या सर्व प्रकरणात एसआयटी करणे गरजेचे आहे आणि या प्रकारचा सखोल तपास होणे गरजेचे आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बीड शहरात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे दोन शिक्षक कोचिंग चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. क्लासनंतर हे दोन शिक्षक मुलीला केबिनमध्ये बोलावून तिचा लैंगिक छळ करायचे. तिला एकटीला केबिनमध्ये बोलावून किस करायचे, छातीला आणि गुप्तांगाला टच करायचे. तसेच अंगावरील कपडे काढायला लावून फोटो काढायचे असे मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार असह्य झाल्याने मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number