Saturday, March 07, 2026 02:53:15 AM

Maharashtra Child Abuse: माणुसकीला काळिमा; सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, शरीरावरील जखमा पाहून पोलीसही हादरले

पोलिसांनी सावत्र वडिलांविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

maharashtra child abuse माणुसकीला काळिमा सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार शरीरावरील जखमा पाहून पोलीसही हादरले

छत्रपती सांभाजीनगर: राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी आणि क्रूरतेच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली असून सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा आणि चटक्यांच्या खुणांमुळे हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील वाळुज परिसरातील तिसगाव, खवड्या डोंगर वसाहतीमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी सावत्र बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Student Assaults Professor: परीक्षेत कॉपी करताना पकडला गेला; संतप्त विद्यार्थ्याने प्राध्यापकांवर केला हल्ला, धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

पीडित मुलीच्या पायावर, हातावर, चेहऱ्यावर तसेच कानामागील भागावर गंभीर जखमा आणि काळे व्रण आढळून आले आहेत. या जखमांवरून अत्याचाराची तीव्रता किती गंभीर होती याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविषयीची अधिक माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Horrible Accident News: हसतं-खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त! कार आणि ट्रकचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; सात जणांचा जागीच मृत्यू


सम्बन्धित सामग्री