जळगावच्या उमाळा फाट्याजवळ भीषण अपघात; शाळकरी मुलांना नेणारे छोटा हत्ती वाहन पलट्याने 8 ते 10 विद्यार्थी जखमी

जळगावजवळील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला.
Jalgaon school van accident
Jalgaon school van accident

जळगाव : जळगावजवळील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ ते दहा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. शाळा सुटल्यानंतर आठवी, नववी आणि दहावीतील विद्यार्थी बसची वाट पाहत होते. त्याचवेळी समोरून आलेल्या छोटा हत्ती वाहनाला हात दाखवून विद्यार्थी कंडारी येथे जाण्यासाठी त्यात बसले. मात्र, काही अंतरावरच वाहनाचा अपघात होऊन ते पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांच्या प्रकृतीची चिंता असल्याने अनेक महिला पालकांना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा : मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याने पराभव; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचा थेट आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे काही विद्यार्थी बसची वाट पाहत उमाळा फाट्याजवळ उभे होते. दरम्यान समोरून येणाऱ्या एका छोटा हत्ती वाहनाला विद्यार्थ्यांनी हात दाखवून थांबवले आणि तेथून कंडारी येथे जाण्यासाठी त्या वाहनात बसले. मात्र, गाडी काही अंतरावरच पोहोचली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन अचानक पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version