Devendra Fadnvis : ‘कुणाचंही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही; पोकळ धमक्यांना कुणी घाबरू नये’; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

नागपूर : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर खासदार संजय दीना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आल्यामुळे प्रचंड राजकीय तणाव निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन […]

Devendra Fadnvis : ‘कुणाचंही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही; पोकळ धमक्यांना कुणी घाबरू नये’; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

नागपूर : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर खासदार संजय दीना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आल्यामुळे प्रचंड राजकीय तणाव निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याच्या आणि बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे, याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, कोणाचंही घर बॉम्बने उडवू देणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच पोकळ धमक्यांना कुणीही घाबरू नये, पोलीस यावर योग्य ती कारवाई करतील, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.   
हेही वाचा : Maharashtra Politics : ठाकरेंचे दानवे महायुतीच्या गोटात? महायुतीचा ‘तो’ दावा खरा ठरणार? राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर विमानतळाच्या हस्तांतरण प्रक्रियेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी हा संवाद साधला. त्यांनी माहिती दिली की, नागपूर विमानतळाचे अधिकृत हस्तांतरण जीएमआर समूहाकडे करण्यात आल्याने शहराच्या विकासाला नवे पंख मिळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि न्यायालयीन अडथळे दूर झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होईल. तसेच नागपूर विमानतळाच्या ग्राउंड फील्ड प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचा विमानतळ उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर झाला. जीएमआरच्या माध्यमातून नागपूरला आधुनिक विमानतळ मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number