जळगाव: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून संजय वराडे नामक व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात हा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर असताना हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. पैसे वेळेत मिळत नसल्याने ठेकेदाराने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: Solapur Suicide Case: एकाच घरात गळफास घेत तरुण-तरुणीने संपवलं जीवन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना अचानक समोर एक व्यक्ती आला आणि त्याने रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. संजय वराडे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे.