Jitendra Awhad: शिवरायांच्या राज्याभिषेकावर वादग्रस्त विधान; विधीमंडळात सत्ताधाऱ्यांचा रुद्र अवतार, आव्हाडांनी थेट हात जोडून…

&quotछत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने टिळक लावून करण्यात आला होता,&quot असे वक्तव्य आव्हाडांनी करताच सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी संताप व्यक्त केला.

Jitendra Awhad: शिवरायांच्या राज्याभिषेकावर वादग्रस्त विधान; विधीमंडळात सत्ताधाऱ्यांचा रुद्र अवतार, आव्हाडांनी थेट हात जोडून…

Jitendra Awhad: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्म स्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकासंदर्भात केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले. “छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने टिळक लावून करण्यात आला होता,” असे वक्तव्य आव्हाडांनी करताच सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी संताप व्यक्त केला. वाढता विरोध पाहून आव्हाडांनी तात्काळ हात जोडून सभागृहाची माफी मागितली, मात्र त्यांच्या निलंबनाची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नेमकं प्रकरण काय?
अधिवेशनात बोलताना आव्हाड यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयकावर भाष्य केले. “आम्हाला विधेयकाला नाही, तर त्यामागील हेतूला विरोध आहे,” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या थोर पुरुषांचा उल्लेख केला. मात्र, हे सांगताना त्यांनी एका पुस्तकाचा संदर्भ देत म्हटले की, “शिवरायांनाही त्यावेळी क्षुद्र मानले गेले होते आणि त्यांचा राज्याभिषेक करताना पायाच्या अंगठ्याने टिळक लावण्यात आला होता.” या अजब विधानामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

‘इतिहास पुराव्यानिशी बोला’; मंत्र्यांनी ओढले ताशेरे  
आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे मंत्री आणि भाजप आमदार आक्रमक झाले. शिवसेना नेते शंभूराजे देसाई यांनी म्हटलं की, “असा इतिहास आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत. हे विधान अत्यंत चुकीचे असून ते कामकाजातून तातडीने काढून टाकावे.” तथापी, दादा भूसे म्हणाले, “शिवरायांचा हा घोर अपमान असून कोणाचे तरी लांगूलचालन करण्यासाठी अशी भाषा वापरली जात आहे. आव्हाडांनी केवळ सभागृहाचीच नाही, तर संपूर्ण देशाची माफी मागायला हवी.” याशिवाय, भाजप आमदार नितेश राणे यांनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. “शिवरायांबद्दल असे बोलण्याची हिंमत कशी होते?” असा सवाल करत त्यांनी सभागृह दणाणून सोडले.

हेही वाचा – Freedom of Religion Bill: आता बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांची खैर नाही! फडणवीस सरकारने मांडले ‘धर्म स्वातंत्र्य विधेयक’

आव्हाडांची दिलगिरी आणि अध्यक्षांचा निर्णय
सभागृहात सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून जितेंद्र आव्हाड यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सभागृहात हात जोडून माफी मागितली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आव्हाड यांचे ते वादग्रस्त वक्तव्य विधानसभेच्या कामकाजातून (पटलावरून) काढून टाकण्याचे आदेश दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number