Sunday, November 16, 2025 11:50:41 PM

Nilesh Ghaiwal: लंडनमध्ये घायवळचा मिळाला ठाव ठिकाणा; पोलिसांकडून घायवळला भारतात परत आणण्याची मोहीम

पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ परदेशात असल्याचे पोलिसांची पुष्टी दिली आहे. खोट्या पत्त्यावर मिळवलेल्या पासपोर्टवरून लंडनमध्ये तो थांबलेला.

nilesh ghaiwal लंडनमध्ये घायवळचा मिळाला ठाव ठिकाणा पोलिसांकडून घायवळला भारतात परत आणण्याची मोहीम

पुण्यातील गुन्हेगारी जगतातील चर्चेत असलेला निलेश घायवळ सध्या परदेशात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, घायवळ हा लंडनमध्ये आहे. त्याचा मुलगा तेथे शिकत असल्याने तो तिथेच राहतोय, अशी माहितीही मिळाली आहे. विशेष म्हणजे, घायवळचा व्हिसा 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे.

दरम्यान, घायवळने खोटा पत्ता आणि बदललेले आडनाव वापरून पासपोर्ट काढल्याचा आरोप तपासात सिद्ध झाल्याने, पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. त्याने ‘अहिल्यानगर’ नावाच्या पत्त्यावर कागदपत्रे दिली होती, पण त्या ठिकाणी असा पत्ता अस्तित्वातच नाही, हे उघड झाले. शिवाय, त्याने पासपोर्ट अर्जात स्वतःवर कोणताही गुन्हा नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचे समोर आले आहे.

निलेश घायवळ आणि त्याच्या गटावर पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. गेल्या महिन्यात कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबार आणि मारहाणीच्या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासह त्याच्या टोळीतील सहा जणांना अटकही करण्यात आली आहे. यावरूनच पोलिसांनी त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत कारवाईही केली होती.

हेही वाचा: Indian Rupee Updates: चलन बाजारात रुपयाची सौम्य घसरण; रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न

घायवळला यापूर्वी न्यायालयाने काही अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला होता. त्यावेळी पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याने चुकीच्या मार्गाने नवीन पासपोर्ट मिळवून परदेशात पळ काढल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांचा संताप वाढला असून तपास अधिक काटेकोरपणे सुरू आहे.

पुणे पोलिसांनी ब्रिटनच्या हाय कमिशनला पत्र लिहून घायवळचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. युके अधिकाऱ्यांनीही स्थानिक पोलिसांना माहिती दिली असून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावर पत्रव्यवहार सुरू आहे.

या सर्व घडामोडींमुळे आता निलेश घायवळला परत भारतात आणण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्याच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिस या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देत आहेत. पुढील काही दिवसांत या केसला आणखी वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Central Railway: मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय, नागपूर, कोल्हापूर ते बनारसाठी 10 विशेष गाड्या चालविण्यात येणार


सम्बन्धित सामग्री