Wednesday, June 18, 2025 02:03:29 PM

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या आरोपी रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार?

ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या रवी वर्माची 2 जून रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. तसेच, सोमवारी ठाणे न्यायालयात एटीएसची (ATS) टीम आरोपी रवी वर्माला हजर करणार आहे.

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या आरोपी रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार

मुंबई: पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माला 30 मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. अशातच, रवी वर्मा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या रवी वर्माची 2 जून रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. तसेच, सोमवारी ठाणे न्यायालयात एटीएसची (ATS) टीम आरोपी रवी वर्माला हजर करणार आहे.

आरोपी रवी वर्माची पोलिस कोठडी संपल्यानंतर, एटीएस (ATS) चौकशीसाठी न्यायालयात काही दिवसांसाठी अधिक तपासासाठी पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. रवी वर्माने मुंबईतील नौदल डॉकयार्डच्या स्थानाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पाठवल्याचे समोर आले होते. फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटना संवेदनशील ठिकाणांचे अनेक नकाशे पाठवण्यात आल्यामुळे ठाणे एटीएसच्या टीमने (ATS) रवी वर्माची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

कोण आहे आरोपी रवी वर्मा?

रवी वर्मा हा नेव्हल डॉक येथे फिटर म्हणून कार्यरत होता. गेल्या एक वर्षांपासून रवी वर्मा फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात होता. व्हिडिओच्या माध्यमातून ती मुलगी संपूर्ण अंगप्रदर्शन करत होती, ज्यामुळे रवी वर्मा तिच्या सौंदर्याने मोहित झाला आणि हनी ट्रॅपमध्ये सापडला. गेल्या दोन महिन्यांपासून एटीएस रविकुमार वर्माच्या सूक्ष्म हालचालींवर लक्ष ठेवून होते.

रवी नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून काम करत असल्यामुळे त्याला येथील संपूर्ण परिसराची माहिती होती. इतकंच नाही, तर रवी वर्मा केरळ, कोची आणि अलिबाग येथे कामानिमित्त येत होता. माहितीनुसार, रवीने या भागातील काही संवेदनशील माहिती त्या पाकिस्तानी मुलीला दिली होती.


सम्बन्धित सामग्री