Friday, December 05, 2025 02:48:23 AM

NMI Airport First Flight Date: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या उड्डाणाची तारीख निश्चित; ‘या’ दिवशी झेपावणार पहिले प्रवासी विमान

पहिल्या टप्प्यात, विमानतळावरून दररोज 23 नियोजित उड्डाणे सुरू होतील. पहिल्या महिन्यात विमानतळाची सेवा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत, म्हणजे 12 तास सुरू राहणार आहे.

nmi airport first flight date नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या उड्डाणाची तारीख निश्चित ‘या’ दिवशी झेपावणार पहिले प्रवासी विमान

NMI Airport First Flight Date: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMI Airport) व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. 25 डिसेंबर रोजी येथून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, विमानतळावरून दररोज 23 नियोजित उड्डाणे सुरू होतील. पहिल्या महिन्यात विमानतळाची सेवा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत, म्हणजे 12 तास सुरू राहणार आहे. या काळात प्रति तास जास्तीत जास्त 10 उड्डाणांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

अदानी समूह आणि CIDCO यांच्या संयुक्त प्रयत्नातून विमानतळ विकास

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) मार्फत करण्यात आला आहे. यात अदानी समूहाचा 74 टक्के, तर महाराष्ट्र सरकारच्या नगर-विकास प्राधिकरण CIDCO चा 26 टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा - Soybean Rates Today: सोयाबीन मार्केटमध्ये धडाकेबाज उलथापालथ! महाराष्ट्रात दरतफावतीची मोठी नोंद

उद्घाटन आणि परवानगी

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन झाले. तसेच 30 सप्टेंबर ला DGCA कडून विमानतळाला अधिकृत परवाना मिळाला. याआधी 30 ऑक्टोबरला पहिले उड्डाण होणार असल्याची चर्चा होती, मात्र अधिकाऱ्यांनी ते स्पष्टपणे फेटाळले आणि पहिली सेवा डिसेंबर 2025 मध्येच सुरू होणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा - Devendra Fadnavis On Karjmafi : 'कर्जमाफी हा उपाय नाही तर...', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

डीबी पाटील यांच्या नावाने विमानतळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार विमानतळाचे नाव “लोकनेते डीबी पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे असेल. प्रकल्पाचा विकास पाच टप्प्यांत होत असून मुंबई महानगर प्रदेशातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री