नाफेड अजूनही बाजार समितीत कांदा खरेदी करता उतरले नसून सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांचा कांदा नाकारण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नाफेडला नेमका कोणत्या प्रकारचा कांदा अपेक्षित आहे आणि खरेदीचे वास्तव काय आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीमध्ये कांदा खरेदीसंदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू असून बी-ग्रेड कांद्यालाही सुमारे ₹1530 भाव देणार असल्याची माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली आहे. याबाबत कशा पद्धतीने कांदा खरेदी केले जाईल नक्कीच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे कांद्याचे दर वाढल्यानं शासकीय कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असून नाफेड आणि एनसीसीएफला देण्यात आलंय 2 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. मात्र, बाजार समितीतील दर आणि शासकीय खरेदीच्या दरात तफावत असल्यानं शासकीय खरेदी ठप्प झाली आहे.
शासकीय खरेदीचा दर 1580 रुपये प्रतिक्विंटल तर बाजार समितीतील दर 2000 रुपयांच्या घरात आहे. यंदाच्या आठवड्यातील बाजाराभावाचा अभ्यास करून शासकीय खरेदीचा दर पुन्हा वाढविण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.