Wednesday, June 18, 2025 03:49:23 PM

डिलिव्हरी बॉयचा मराठी बोलण्यास नकार; भांडूपमध्ये मराठी दाम्पत्याचा आग्रह

नुकताच, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मराठी जोडपं पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत मराठीत बोलण्याच्या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहे.

डिलिव्हरी बॉयचा मराठी बोलण्यास नकार भांडूपमध्ये मराठी दाम्पत्याचा आग्रह

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेवर सातत्याने वाद होत आहेत. तसेच, मराठी भाषेवर सतत विरोध केला जात आहे. परप्रांतीयांकडून मराठी भाषेविरोधात विरोध केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशातच, आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मराठी जोडपं पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत मराठीत बोलण्याच्या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

माहितीनुसार, हा प्रकार भांडुप येथील साई राधे इमारतीमध्ये घडला आहे. रोहित लावरे नावाचा हा डिलिव्हरी बॉय तिथे पिझ्झा देण्यासाठी गेला होता. या जोडप्याने त्या डिलिव्हरी बॉयला, 'आम्हाला हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे तू मराठीत बोल', असं सांगितले. मात्र, डिलिव्हरी बॉयने हिंदी भाषेवर ठाम राहून म्हणाला, 'मराठीत बोलणार नाही', अशी भूमिका घेतली.

मराठीत बोलण्याची जबरदस्ती का?

डॉमिनॉज पिझ्झाची ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने विचारले, 'जबरदस्ती है मराठी बोलने का? पर क्यू?' तेव्हा त्या जोडप्याने उत्तर दिले, 'है, यहाँ पे ऐसा ही है'. डिलिव्हरी बॉयने त्यांना म्हणाले, 'कौन बोला ऐसा? हिंदी बोलने को नहीं आता तो ऑर्डर नहीं करने का ना. नहीं देना है ना पैसा हां ठीक है'.

हा सर्व प्रकार डिलिव्हरी बॉयने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. तेव्हा ती महिला म्हणाली, 'माझा व्हिडिओ काढू नकोस'. त्यानंतर त्या महिलेने देखील व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात, रागाच्या भरात त्या महिलेच्या पतीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी पिझ्झ्याचा ऑर्डर खराब असल्याचंही म्हटलं. डिलिव्हरी बॉयने त्यांना म्हणाले, 'ऑर्डर खराब असेल तर दाखवा'. इतकंच नाही, तर पैसे न घेताच डिलिव्हरी बॉय तिथून निघून गेला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एकीकडे, 'महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती होत असताना फ्रि पिझ्झासाठी अशा प्रकारचा वाद घालणं चुकीचं आहे', असं अनेकांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, 'मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांवर तक्रार करा. मात्र, त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही', असं काहींचं म्हणणं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे. एकीकडे महाराष्ट्रात मराठीची सक्ती होत असताना फ्रि पिझ्झासाठी असा वाद घालणं योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींची रितसर तक्रार करण्यापेक्षा वाद घालण्यात अर्थ नसल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.


सम्बन्धित सामग्री