Nashik Accident: देवळा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात; समोरून आलेल्या इर्टिगाने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

नाशिकच्या देवळा-मालेगाव मार्गावर मोटारसायकल आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली.

Nashik Accident: देवळा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात; समोरून आलेल्या इर्टिगाने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात देवळा-मालेगाव मार्गावर झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. पिंपळगाव वाखरी शिवारात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर इर्टिगा कारचा चालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळा-मालेगाव रोडवरील पिंपळगाव-वाखरी शिवारात सायंकाळी सुमारे सहा वाजता हा अपघात झाला. देवळा तालुक्यातील दहिवड येथील रहिवासी देविदास पांडुरंग ठाकरे (वय 26 ) आणि कैलाश पुंडलिक देवरे (वय 55) हे दोघे मोटारसायकलवरून दहिवडच्या दिशेने देवळ्याकडे जात होते.

हेही वाचा: Best Bus Accident: मुलुंड चेकनाका येथे भीषण अपघात; बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू

त्याचवेळी देवळ्याकडून दहिवडकडे जाणाऱ्या इर्टिगा कारशी त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले. मात्र, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळी थांबण्याऐवजी वाहन तिथेच सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

हेही वाचा:  Vasmat Journalist Assault: गोवंशाच्या बातम्या प्रसिद्ध करणं पडलं महागात! वसमतमध्ये पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या इर्टिगा चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचाही तपास केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number