Maharashtra Flood : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Flood : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पूरबाधीत शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा: Amravati News: 'पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा कार्यक्रम…';शेतकऱ्याने प्रशासनालाच धाडलं नुकसानीचं निमंत्रणपत्र

खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर

हिंगोली: ऑगस्ट महिन्यात पूरबाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. माहितीनुसार, पूरबाधीत शेतकऱ्यांची संख्या 3.04 लाख आहे, तसेच, बाधित क्षेत्र 2.71 लाख हेक्टर आहे. हिंगोलीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 231.18 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

बीड: ऑगस्ट महिन्यात बीड येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशातच, बीड येथील पूरबाधित शेतकऱ्यांना 53.74 रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या तब्बल 1.14 लाख आहे. 

धाराशिव: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये पूरबाधित शेतकऱ्यांची संख्या 2.34 लाख इतकी आहे. तसेच, पूरबाधित शेतकऱ्यांना 189.61 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. 

लातूर: ऑगस्ट महिन्यात लातूरमध्ये पूर आल्याने पूरबाधित शेतकऱ्यांची संख्या 3.80 लाख इतकी आहे. अशातच, पूरबाधित शेतकऱ्यांना 2.35 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

नाशिक: ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे, तब्बल 7 हजार 108 शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, प्रशासनाने याची दखल घेत पूरबाधित शेतकऱ्यांना 3.82 कोटींची मदत मंजूर केली. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

धुळे: ऑगस्ट महिन्यात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आल्याने जवळपास 72 शेतकरी वाधित झाले. बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नंदुरबार: ऑगस्ट महिन्यात नंदूरबारमध्ये जवळपास 25 शेतकरी बाधित झाले. त्यामुळे, प्रशासनाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

जळगाव: ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास 17 लाख 332 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत, प्रशासनाने दखल घेत पूरबाधीत शेतकऱ्यांना 9.86 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. 

अहिल्यानगर: ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगरमध्ये पूर आल्याने 140 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number