Sunday, June 15, 2025 12:16:52 PM

विपश्यना केंद्रातील साधना पूर्ण करून धनंजय मुंडे बीडकडे रवाना

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात 10 दिवसांचा आश्रय घेतला.

विपश्यना केंद्रातील साधना पूर्ण करून धनंजय मुंडे बीडकडे रवाना

किरण गोटूर. प्रतिनिधी. नाशिक: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. या प्रकरणामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण होऊ लागला. त्यामुळे धनंजय मुंडेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच छगन भुजबळांनी मुंबईतील राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली. यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात 10 दिवसांचा आश्रय घेतला. 

हेही वाचा: नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सोडली साथ

तसेच 10 दिवसांची साधना पूर्ण करून 1 जुन रोजी पहाटे आपल्या निवास्थानी रावाना झाले. 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या दहा दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी आनापान ही साधना केली. 31 मे रोजी 'मंगल मैत्री' हा साधनेचा शेवटचा दिवस होता. या दिवशी साधना करणारे सर्व साधक एकमेकांना भेटतात आणि आपला परिचय देतात. मात्र धनंजय मुंडे यांनी कुणालाही न भेटता आपल्या कक्षात राहणे आणि साधना करणे पसंत केले.


सम्बन्धित सामग्री