Thursday, March 12, 2026 10:10:27 PM

Dhoki Panchayat Result 2026 : उद्धव ठाकरे यांचा उमेदवार ढोकी पंचायत समितीत फक्त एका मताने जिंकला

राज्यभरात 7 फेब्रुवारीला  12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले.धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणातून फक्त एका मताने शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहेत

dhoki panchayat result 2026  उद्धव ठाकरे यांचा उमेदवार ढोकी पंचायत समितीत फक्त एका मताने जिंकला

राज्यभरात 7 फेब्रुवारीला  12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले.  या  निवडणुकांचे निकाल आज, सोमवारी जाहीर होत आहेत. यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण 66.28 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पुण्यात 68.35  टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील एकूण 1 कोटी 41 लाख 90 हजार 211 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. अशातच धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणातून फक्त एका मताने शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अमर समुद्रे यांनी एका मताने भाजपच्या निहाल काझी यांचा पराभव केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटातील अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली असून भाजपच्या निहाल काझी यांनी 3186 मतं मिळाली आहेत. ढोकी गणात मजमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. अखेर अमर समुद्रे यांनी अवघ्या एका मताने निहाल काझी यांचा पराभव केला आहे.


सम्बन्धित सामग्री