धुळ्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्दयी मुलाने आपल्या जन्मदाती माऊलीला क्षुल्लक कारणाने पेटवलं आहे. धुळे शहरालगत असलेल्या महिंदळे येथे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता प्रदीप घरी आला. त्याने दारुचे अतिसेवन केले होते. त्याच अवस्थेत तो घरी आली. त्याने घरी आल्याबरोबर आईला प्रश्न केला की, तु माझं लग्न का लावून देत नाहीस… त्याला उत्तर देताना त्याच्यात आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला.
हेही वाचा- Crime News : दोघांचं भांडण तिसऱ्यावर वार! नवरा-बायकोचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मेहुणीवरच चाकूहल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
त्याने रागाच्या भरात कसलाच मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्याच आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून थेट पेटवून दिले. दरम्यान या आगीत ती गंभीर भाजल्यामुळे त्या माऊलीचा तडफडून मृत्यू झाला. आरोपी प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (45) हा रिक्षाचालक असून मृत महिलेचे नाव जिजाबाई भटू खैरनार पाटील (65) असे आहे.
घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान धुळे शहरालगत असलेल्या महिंदळे येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.