पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. कोणाचाही हस्तक्षेत सहन करु नका अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत. अजित पवारांकडून वैष्णवीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यात आलं आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर मी दोषी असेल तर मलाही शिक्षा द्या असेही पवार म्हणाले होते. आता पवारांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. अजित पवारांच्या पोलिसांना कोणाचाही हस्तक्षेत सहन करु नका अशा सूचना दिल्या आहेत. मोठ्या सरकारी वकिलांची नियुक्ती केली. वैष्णवी मृत्यू प्रकरण, फास्ट ट्रॅकवर चालवू तसेच आरोपींना कडक शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा : वैष्णवीचे बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणविरोधात गुन्हा; निलेशचे अश्लील कारनामे समोर
वैष्णवी हगवणे प्रकरणात सासू लता, नवरा शशांक आणि नणंंद करिष्मा या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. परंतु सासरे राजेंद्र आणि दीर सुशील फरार होते. आज पहाटे दोघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
वैष्णवीच्या गुन्हेगारांवर कारवाई झाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतानाही कारवाई केली. राजकारणविरहीत कारवाई केली असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले. मात्र या प्रकरणात पवार कुटुंबियांवर सातत्याने आरोप केले जात आहेत. यावर मी फक्त लग्नाला गेलो माझा काय संबंध? असा सवाल अजित पवारांनी केला. या प्रकरणात अजित पवारांचे नाव सातत्याने घेतल्याने अजित पवारांचा पारा पुन्हा चढला. आरोपींना सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.