दारूच्या नशेत स्टेअरिंग हाती घेतलं अन् रस्त्यावर थरार; कोथरुडमधील VIDEO पाहून हादरून जाल

Pune Shocking Video : पुण्यातील कोथरुड परिसरात मद्यधुंद तरुणाच्या कारमुळे गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी कॉलेज रस्त्यावर घडलेल्या या प्रकारात अनेक दुचाकींचे नुकसान झाले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दारूच्या नशेत स्टेअरिंग हाती घेतलं अन् रस्त्यावर थरार; कोथरुडमधील VIDEO पाहून हादरून जाल
Drunk Driving Horror in Pune

पुण्यातील कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाचा धुडगूस पाहायला मिळालेला आहे. भरधाव कारने अनेक दुचाकींना जोरदार धडक दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना एमआयटी कॉलेज रस्त्यावर घडली आहे. मद्याच्या नशेत असलेल्या या तरुणाने भरधाव वेगात कार चालवत समोरील दुचाकींना धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कोथरुडसारख्या गजबजलेल्या भागात असा भीषण प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे शहरात वारंवार अशा घटना घडत असूनही मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित तरुणावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number