Middle East War Impact On Farmers : आखाती युद्धामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! कृषी साहित्य महागले, शेतमालाच्या दरात मात्र मोठी घट

आखाती देशांमध्ये युद्ध पेटून 12 दिवस लोटले आहेत. याचा परिणाम आता थेट अद्यावत तंत्रज्ञान वापरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर झाला आहे.

Middle East War Impact On Farmers : आखाती युद्धामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! कृषी साहित्य महागले, शेतमालाच्या दरात मात्र मोठी घट

आखाती देशांमध्ये युद्ध पेटून 12 दिवस लोटले आहेत. याचा परिणाम आता थेट अद्यावत तंत्रज्ञान वापरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ठिंबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी अवलंब केला जातो. तसेच भाजीपाला ठेवण्याच्या प्लास्टिक थैलीचे दर आता 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडणार आहे. एका वेळी कृषी साहित्यांचे 40 टक्क्यांनी वाढेलेल दर हे शेतकऱ्यांवर आर्थिक भूदड वाढवणारे ठरत आहेत. यावर आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी अधिक माहिती घेतली आहे. 

हेही वाचा- Middle East Conflict: महागाईमुळे पेटवलेली चूलही विझणार! युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसनंतर लाकूडही परवडेनासे; दर ऐकून चिंता वाढेल
अशातच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गॅस पुरवठ्यावर झाला असून याचा थेट परिणाम विविध व्यवसायांवर झालेला पाहायला मिळत आहे. गॅस पुरवठा बंद झाल्याने एमएमआर रिजन मधील अनेक हॉटेल्स बंद पडत असून याचा थेट परिणाम एपीएमसीतील भाजी मार्केट वर झाला आहे. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठावंच नसल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत असून भाजीपाल्याला उठाव नसल्याने भाज्यांचे दर तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी घसरलेले पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा- Air Taxi: ट्रॅफिकचं टेन्शन विसरा! आता आकाशातून उडणार ‘एअर टॅक्सी’; लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा

वांगी, फ्लॉवर, कोबी, भेंडी आणि वाटाणाच्या दरात मोठी घट झाली असून यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. एकीकडे कृषी साहित्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढलेले असताना दुसरीकडे भाजीपाल्याच्या दरात मोठी घट झाली आहे. दरम्यान उत्पादनासाठी अधिक खर्च करावा लागत असताना बाजारात मालाला योग्य भाव मिळत नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अक्षरशः ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number