Dhananjay Mude : "जन्मताच ‘तो’ त्रास, तरी कसा वाचलो देव जाणे" धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली मनातील खंत

बीडच्या भायाळा गावातील नारळी सप्ताहास धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी धनंजय मुंडेंनी येथील व्यासपीठावरुन गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर भावनिक भाषण केलं.

Dhananjay Mude : &quotजन्मताच ‘तो’ त्रास, तरी कसा वाचलो देव जाणे&quot धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली मनातील खंत

बीडच्या भायाळा गावातील नारळी सप्ताहास धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. यावेळी धनंजय मुंडेंनी येथील व्यासपीठावरुन गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर भावनिक भाषण केलं. दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यात बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकरणी बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान धनंजय मुंडे यांनी गेल्या दीड वर्षातील घडामोडींवर भाष्य केलं. 

हेही वाचा- Chandrashekhar Bawankule : शासकीय रस्ता अडवला तर थेट योजनांपासून होणार वंचित; बावनकुळेंचा शेतकर्‍यांना थेट इशारा
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, “जसा जन्माला आलो तसा माझ्या पाठीमागे संघर्ष आहे. जन्माला आलो चार महिने डोळे उघडले नाहीत, जन्मताच लिव्हरचा त्रास कसा वाचलो देव जाणे,अनेकदा वरून संकट आले पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे बीडच्या भायाळा गावातील नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.” 

हेही वाचा- Ashok Kharat Case Nashik : भोंदू खरातचा पर्दाफाश करणारा पत्रकार गोत्यात; सोशल मीडियावर महिलेसोबत फोटो व्हायरल

पुढे बोलताना ते म्हणाले की, “अशी कितीही संकट येऊ द्या जे बोलायले त्यांना बोलू द्या.कितीही बोलले तरी मी सव्वा वर्ष बोललो नाही.आणखी नही बोलणार नाही. आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे बोलल्यानंतर काय होईल. माझे स्वागत करताना एका एका व्यक्तीच्या डोळ्यात सव्वा दीड वर्ष माझ्यावर झालेले आघात याचा रागही दिसत होता. आणि व्यवस्थित या ठिकाणी आलो याचा आनंदही दिसत होता. मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा एकदम माझ्या गाडीचा समोर आडवा झाला.. गाडीचा समोर तसाच आडवा ठेवून मी पायी पायी.. रथावर घोड्याच्या बसावं लागतं मोराच्या नाही. उदाहरण करण्याचा दिलं पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय येत आहे. त्यामुळे त्याला माहित आहे कुठल्या रथावर बसायचे ते. सगळ्यांची क्षमा मागतो त्यामुळे मी रथात बसलो नाही”, असा किस्साही भाषणातून धनंजय मुंडे यांनी सांगितला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number