दिवेआगर दुर्घटना : शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा ‘त्या’ 8 विद्यार्थ्यांचे मृतदेह पुण्याकडे रवाना; समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित

दिवेआगार येथील समुद्रकिनारी आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असून गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे मृतदेह पुण्याकडे रवाना झाले
diveagar beach incident
diveagar beach incident

रायगड : दिवेआगर समुद्र किनारी आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल, गुरुवारी सायंकाळी घडली. त्यानंतर मृत पावलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ली प्राथमिक रुग्णालयात आणण्यात आले होते. पुढे श्रीवर्धनमधील जिल्हा रुग्णालयात या मुलांचे शुभविच्छेदन करण्यात आले. दरम्यान रात्री उशीरा पुण्याहून या विद्यार्थ्यांचे नातलग घटनास्थली दाखल झाले. रायगडच्या श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालया बाहेर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. आपल्या मुलांना गमावण्याचे दुःख त्यांना अनावर झाले होते. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेले मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. रात्री उशिरा मृतांचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेत प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुण्याकडे रवाना झाले.

दिवेआगरमध्ये आळंदी येथील आठ जण बुडाले असून खासदार सुनील तटकरे यांच्याकडून घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला आहे. दिवेआगरमधील घटना शोक कारी आहे. दिवेआगरमधील समुद्र किनारा सुरक्षित करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. दिवेआगरमधील दुर्घटनेबाबत पुन्हा असे प्रकार घडणार नाही, यासाठी मी प्रयत्न करत असतो. अशा दुर्घटना मनामधून संवेदना व्यक्त होतात. मात्र अशा दुर्घटना टाळण्यासाठी माझी पांडुरंग चरणी प्रार्थना आहे. सरकार याबाबतीत उचित निर्णय घेऊन मुलांचा कुटुंबाला मदतीकरीता विचार करेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्री भरत गोगावले हेदेखील रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले. गोगावलेंकडून घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला. धोकादायक समुद्र किनाऱ्यावर ठोस उपायोजना करणार, असे गोगावले म्हणाले. तर मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी सरकार विचाराधीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना काळाचा घाला! समृद्धी महामार्गावर ट्रक-टेम्पो ट्रॅव्हल्सची भीषण धडक; 7 ठार, 18 गंभीर

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यादेखील रात्री उशीरा श्रीवर्धनमध्ये दाखल झाल्या. त्यांनी मृत मुलांच्या नातेवाईकांना भेटून मृतांना श्रद्धांजली वाहिली. दिवेआगर दुर्घटनेवर आदिती तटकरे यांनी शोक व्यक्त करत ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले. सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी..निसर्ग आणि त्याच्या मर्यादा यांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. मृतांच्या कुटुंबासोबत संपूर्ण सरकार पाठशी. मृतांच्या कुटुंबाला आधार देणे गरजेचे आहे. अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये याकरिता कोणीही आनंद लुटताना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. हातातोंडाशी आलेली मूल पालकांनी गमावली, यावर तटकरे यांनी दुःख व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या बससोबत पोलीस कर्मचारी न पाठवल्याच्या मुद्द्यावरून मंत्री आदिती तटकरे पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्या. दिवेआगार दुर्घटनेतील विद्यार्थ्यांची बस रात्री दिवेआगार येथून ताम्हिणी घाटमार्गे आळंदीला मध्यरात्री निघाली. विद्यार्थ्यांची मनःस्थिती घाबरलेली होती, याचा उल्लेख करत आदिती तटकरे यांनी पोलिसांना प्रश्न विचारले. ताम्हिणी घाटमार्गे रात्रीच्या वेळी बस जाणार असताना सोबत पोलीस कर्मचारी का दिला नाही, असा सवाल आदिती तटकरे यांनी केला. पोलिसांच्या या बेजबाबदार पणावर आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, हे सहलीला आलेले विद्यार्थी आळंदी येथील विनर्स अकॅडमीची असून या अकॅडमीच्या शास्त्रीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.  आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा आज दुपारी दिवेआगार येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आम्ही रायगड पोलीस आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहोत. पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी याविषयी संयम बाळगावा. विनर्स अकॅडमी बेकायदेशीर असल्यास अकॅडमी विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी दिघी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर यांनी दिली आहे.

आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे 42 विद्यार्थी आणि दोन शिक्षक हे रायगड आणि दिवेआगार येथे सहलीसाठी गेले होते. त्यादरम्यान आठ विद्यार्थ्यांना दिवेआगार येथे समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती आळंदी येथील नागरिकांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांचा या दुर्घटनेत दर्दैवी मृत्यू झाला त्या विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक हे श्रीवर्धन आणि दिवेआगाराकडे गेले असून घटनेची माहिती मिळताच पालकांनी या अकॅडमीच्या बाहेर गर्दी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version