कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबतच 'मनसे' सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचपार्श्वभूमिवर शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- KDMC Politics : कल्याण-डोंबिवलीत सत्तेचं नवं समीकरण; भाजपला मोठा धक्का, मनसेची शिंदेंच्या शिवसेनेला साथ
नरेश म्हस्के म्हणाले की, "यावेळी शिवसेना-भाजप युती म्हणून कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिका निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये देखीलशिवसेना-भाजप युती म्हणूनच आम्ही बसणार आहोत. जर विकासासाठी सर्वजण सोबत येणार असतील तर आम्ही सर्वांच स्वागतच करु. मनसे सोबत आली तर म्हणजे मनसे काय एमआयएम नाही आहे, की त्यांना आम्ही बाजूला करायच. त्याच्यामुळे जर विकासासाठी जरमनसे सोबत येत असतील तर काही शहरांची राजकारण असतात, शहरांच्या विकासाचे राजकारण असत, त्यात जर कोण सोबत येत असेल तर नक्कीच स्वागत करु".