Monday, May 11, 2026 10:47:24 AM

Dr. Gopalrao Patil Passes Away : राज्यसभेचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचं लातूरमध्ये निधन

dr gopalrao patil passes away  राज्यसभेचे माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचं लातूरमध्ये निधन

लातूर : माजी राज्यसभा सदस्य आणि प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी, 21 एप्रिल रोजी सकाळी महाराष्ट्रातील लातूर शहरात आजारपणामुळे निधन झाल्याची अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते 94 वर्षांचे होते. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात सकाळी 7.12 मि. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला, असे सांगण्यात आले. त्यांनी 1994 ते 2000 या काळात भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिजे. वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या संसदीय समित्यांमध्ये योगदान दिले. डॉ. गोपाळराव पाटील एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली, जी लातूरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय चालवते.

हेही वाचा : Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दुहेरी संकट! कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा; पुढील 3 तास महत्त्वाचे, प्रशासन सतर्क

3 ऑक्टोबर 1931 रोजी धाराशिव जिल्ह्यातील कवठा गावात जन्मलेल्या पाटील यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे ते लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञांपैकी एक बनले. ग्रामीण भागातील त्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेमुळे त्यांना स्थानिकांमध्ये 'देवमाणूस' हे प्रेमळ नाव मिळाले होते. त्यांनी हैदराबादमधील कुर्नूल येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले होते. नंतर त्यांनी इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनची शाखा स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते तिचे पहिले अध्यक्ष बनले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पित केले आहे. तसेच आमदार अमित देशमुख यांनीदेखील पोस्टद्वारे पाटील यांच्या कार्याला वंदन करत आदरांजली वाहिली आहे. 


सम्बन्धित सामग्री