Thursday, May 22, 2025 06:53:35 PM

संजय गायकवाड यांना समज द्या; फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय गायकवाड यांना समज द्या फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

मुंबई : बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गायकवाड यांच्या विधानबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागितली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना फोन करून समज दिल्याचं कळतं आहे. त्यानंतर आमदार संजय गायकवाडांचे सूर बदलले असल्याचे पाहायला मिळतं आहे. मात्र पोलिसांच्या स्थानिक वाईट अनुभवाबाबत  केलेल्या विधानावर ते अजूनही ठाम आहेत. 

पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे आमदार संजय गायकवाड यांना भोवले. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. (बीएनएस) BNS 296, 352 व पोलीस अधिनियम 1922 चे कलम 3 (पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतविने ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. संजय गायकवाड यांनी पोलिसांप्रती केलेल्या विधानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांबद्दल अशी वक्तव्यं खपवून घेणार नाही. संजय गायकवाड यांना समज द्या असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

हेही वाचा : 'जय श्रीराम'च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे 800 यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल अनेक आक्षेपार्ह विधान केलं. सरकारला घरचा आहेर देताना संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात. सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सरळ होईल असेही त्यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांच्या मुलाला एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली. यावर पत्रकारांनी संजय गायकवाड यांना विचारलं असता ते म्हणाले की माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलीस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली. कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलीस हे आकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.


सम्बन्धित सामग्री