Devendra Fadnavis: पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला फडणवीस सरकारचा प्रतिसाद; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, ताफ्यातील गाड्यांसंदर्भातही घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आगामी परदेश दौरे तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis: पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला फडणवीस सरकारचा प्रतिसाद; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, ताफ्यातील गाड्यांसंदर्भातही घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Devendra Fadnavis: देशाच्या आर्थिक हितासाठी आणि विदेशी चलनाची बचत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आगामी परदेश दौरे तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, ज्या दौऱ्यांना यापूर्वी मंजुरी मिळाली होती, ते देखील आता रद्द करण्यात आले आहेत.

प्रमुख निर्णय आणि अंमलबजावणी
अभ्यासासाठी किंवा इतर कामांसाठी मंत्र्यांनी आखलेले सर्व परदेश दौरे आता थांबवण्यात आले आहेत. तसेच मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांच्या संख्येचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांचा मोठा ताफा असतो, जो आता कमी केला जाणार आहे. सामान्य प्रशासन विभाग (GAD) लवकरच ही मोहीम राबवणार आहे. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासाठी प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.

शंभूराज देसाईंचा आदर्श: कौटुंबिक युरोप दौरा केला रद्द
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला वैयक्तिक लंडन-पॅरिस दौरा रद्द केला आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी नियोजित केलेली ही कौटुंबिक सहल त्यांनी 'देश प्रथम' या भावनेतून त्यागली आहे. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

पंतप्रधानांनी स्वतःपासून केली सुरुवात
दरम्यान, जनतेला आवाहन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी केली आहे. तसेच सुरक्षेसाठी असलेल्या 'SPG'ला नवीन गाड्या न खरेदी करता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – Amol Kolhe on PM Modi: 'दाढीवाला बाबा वदला, सवयी बदला!'; अमोल कोल्हेंची कवितेतून पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

देशहितासाठी मोदींचे नागरिकांना आवाहन 

विदेशी चलन बचत: सोन्याची खरेदी आणि परदेश प्रवास टाळावा.
इंधन बचत: पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य द्यावे.
स्वदेशीचा वापर: खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवून स्वदेशी उत्पादने आणि नैसर्गिक शेतीवर भर द्यावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number