Monday, May 11, 2026 10:40:56 AM

Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! नराधम बापाने क्षुल्लक कारणावरून लेकीचा घेतला जीव; आधी लाकूड कापायच्या मशीनने वार, नंतर...

पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये पित्याने 9 वर्षांच्या मुलीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

pune crime पुणे पुन्हा हादरलं नराधम बापाने क्षुल्लक कारणावरून लेकीचा घेतला जीव आधी लाकूड कापायच्या मशीनने वार नंतर

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका पित्याने आपल्या अवघ्या 9 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाने समाजमन सुन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम दुर्योधन चव्हाण असे आरोपी पित्याचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर काही खाडाखोड केल्याच्या रागातून आरोपीने टोकाचे पाऊल उचलले.

या रागाच्या भरात आरोपीने घरातील लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीवर वार करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना केवळ एका क्षणिक रागातून घडली असावी, असे असले तरी त्यामागील क्रूरता आणि अमानुषता पाहता परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला, अशीही माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात आरोपीला मदत केल्याचा आरोप चिंगू शिंदबाद भोसले या महिलेवरही ठेवण्यात आला असून तिने देखील घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास दौंड पोलिसांकडून वेगाने सुरू असून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील प्रत्येक पैलूचा सखोल तपास केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या