Tukaram Munde: ठाण्यात FDA कारवाईत अडथळा; आयुक्त तुकाराम मुंडे यांची निवृत्त सहआयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

निवृत्त अधिकाऱ्याचे हे वर्तन पूर्णपणे अशोभनीय असून ते शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारे आहे, असे निरीक्षण आयुक्तालयाने नोंदवले आहे.

Tukaram Munde: ठाण्यात FDA कारवाईत अडथळा; आयुक्त तुकाराम मुंडे यांची निवृत्त सहआयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

Tukaram Munde FDA Notice : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडालेली असतानाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एफडीएच्या ठाण्यातील एका कारवाईमध्ये थेट हस्तक्षेप करून दबाव आणल्याचा आरोप निवृत्त सहआयुक्त सु. स. देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत आयुक्त मुंढे यांनी देशमुख यांना 7 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावली आहे.

तपासणी आणि धमकीचा संपूर्ण घटनाक्रम
एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकारी क. यो. चिपळूणकर यांनी एका आस्थापनेची तपासणी केली असता तेथे गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. नियमांनुसार मूल्यांकन केल्यानंतर संबंधित प्राधिकरणाने त्या आस्थापनेचा परवाना निलंबित केला. मात्र, या आस्थापनेच्या संचालकाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या निवृत्त अधिकारी देशमुख यांनी चिपळूणकर यांच्या उपस्थितीतच सहायक आयुक्तांना फोन करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.
– चिपळूणकर यांच्या तक्रारीनुसार, देशमुख यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
– शासकीय कामात हस्तक्षेप करत त्यांनी "तुम्हा दोघांनाही बघतो…" अशा शब्दांत अधिकाऱ्यांना थेट धमकी दिली.
– निवृत्तीनंतरही शासकीय कामात प्रभाव टाकून परवाना निलंबन रद्द करण्यासाठी दबाव आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : आता आमदार-खासदार शाळा दत्तक घेणार; गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतले 'हे' मोठे निर्णय

कायदेशीर आणि विभागीय कारवाईचा इशारा
निवृत्त अधिकाऱ्याचे हे वर्तन पूर्णपणे अशोभनीय असून ते शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारे आहे, असे निरीक्षण आयुक्तालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, असा थेट सवाल नोटिशीत विचारण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982 मधील नियम 27(2) अन्वये त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे का पाठवू नये, याबाबतही स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

प्रशासनातील वाढता हस्तक्षेप आणि कडक भूमिका
अन्न व औषध प्रशासनात निवृत्तीनंतरही काही माजी अधिकारी आपली छाप पाडण्याचा आणि कर्मचाऱ्यांवर अनावश्यक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. मात्र आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे अशा प्रकारांना आळा बसेल असे मानले जात आहे. या नोटीसनंतर आता निवृत्त सहआयुक्त काय उत्तर देतात आणि प्रशासन काय पुढील पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Tukaram Mundhe FDA Mahaprasad Guidelines : "…नाही तर गुन्हा दाखल होणार" सणासुदीतील महाप्रसादासाठी एफडीएने कंबर कसली; तडकाफडकी दिला मोठा आदेश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number