Thursday, July 17, 2025 03:24:49 AM

वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामधील हाणामारी व्हायरल

वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी झाली आहे. शहाड उड्डाण पुलाजवळील ही घटना आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामधील हाणामारी व्हायरल

कल्याण: वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी झाली आहे. शहाड उड्डाण पुलाजवळील ही घटना आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.  

कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाण पुलाजवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण वाहतूक कोंडी झाली. कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये चक्क रस्त्यावरच जोरदार हाणामारी  झाली. वाहतूक पोलिसाच्या शिवीगाळ आणि  मारहाणीनंतर वाहतूक कोंडीत अडकलेल्या संतप्त वाहनचालकाने प्रतिउत्तर देत भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण करत डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्धा तास राडा सुरू असल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर इतर वाहनचालकांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा: International Day of Yoga: सत्ताधाऱ्यांनी असा साजरा केला योगा डे, जाणून घ्या..

कल्याणनगर मार्गावरील शहाड पुलाजवळ शनिवारी रात्री वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये मारहाण झाली. वाहन चालक दोन चाकीवरील ताबा सोडत गाडीवरुन उतरला आणि वाहतूक पोलिसाचे कपडे पकडू लागला. त्यानंतर वाहतूक पोलिसाने देखील चालकाचे कपडे पकडले. त्यातच वाहतूक पोलिसाने चालकाला कानाखाली मारली. त्यानंतर चालकाने सुद्धा वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. वाहतूक कोंडी दरम्यान गाड्या थांबल्या होत्या. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या वाहन चालकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. 


सम्बन्धित सामग्री