Ashok Kharat Case : ‘इतक्या वर्षात कधी माहेरी आली नाही, आणि आता…’; कल्पना खरातच्या आईने बोलून दाखवली ही काळजी

Ashok Kharat Case : ‘इतक्या वर्षात कधी माहेरी आली नाही, आणि आता…’; कल्पना खरातच्या आईने बोलून दाखवली ही काळजी

नाशिक : अशोक खरातप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांच्या आई पार्वती शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात त्यांनी 15 दिवसांपासून फरार असलेल्या आपल्या मुलीसाठी काळजी व्यक्त केली आहे. अशोक खरातच्या चौथ्या फौजदारी खटल्यासंदर्भात खरातला आज, मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, अशोक खरातची सासू आणि फरार आरोपी कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे. 

हेही वाचा : Ashok Kharat Case: कोट्यवधी गोठवले, गाडीही केली जप्त; भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

पार्वती शिंदे यांनी स्पष्ट केले की, त्या गेल्या महिनाभरापासून घरीच आहेत. परंतु त्यांना तपासाची किंवा अशोक खरात यांच्या कृतींची काहीही माहिती नाही. त्या म्हणाल्या, “कल्पना कुठे आहे हे मला माहीत नाही आणि मी तिच्याशी फोनवर बोललेसुद्धा नाही. मी शिकलेली नाही, त्यामुळे अधिकारी कशाचा तपास करत आहेत हे मला माहीत नाही. गेली कित्येक वर्ष ती माहेरी आलेली नाही. आणि आता 15 दिवसांपासून कुठे राहत आहे. याची काळजी वाटते. “

शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 15 दिवसांपासून अशोकची पत्नी, कल्पना खरात, फरार आहे. तपास यंत्रणांना अद्याप तिचा शोध लागलेला नाही. आता पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून कल्पनाचे मामा, नातेवाईक, मित्र आणि माजी नोकर यांची चौकशी सुरू केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version