Uddhav Thackeray: ‘भिऊ नका’ हा मेसेज नेमका कोणासाठी? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांच्या भूमिकेवर रोखठोक सवाल

“सत्ताधारी पक्षातील फुटीर गटाला ‘घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे’ असा धीर देणारे पंतप्रधान मोदी आता देशाचे नवीन ‘स्वामी’ झाले आहेत का?” असा उपरोधिक सवाल ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray: ‘भिऊ नका’ हा मेसेज नेमका कोणासाठी? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांच्या भूमिकेवर रोखठोक सवाल

Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भूमिकेवर आणि वक्तव्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. “सत्ताधारी पक्षातील फुटीर गटाला ‘घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे’ असा धीर देणारे पंतप्रधान मोदी आता देशाचे नवीन ‘स्वामी’ झाले आहेत का?” असा उपरोधिक सवाल ठाकरेंनी केला. गद्दारीचा डाग कोणत्याही पाठींब्याने पुसला जाऊ शकत नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

विद्यार्थी अन् संसदेपेक्षा फुटीरांनाच प्राधान्य

पंतप्रधानांच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना मोदींच्या मार्गदर्शनाची गरज आहे. एका मोठ्या भावाप्रमाणे किंवा आजोबांच्या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना भेटून ‘मी तुमच्या पाठीशी आहे’ असा विश्वास द्यायला हवा होता. परंतु, देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि संसदेच्या महत्त्वाच्या कामकाजासाठी वेळ नसणारे पंतप्रधान, पक्ष सोडून गेलेल्या फुटीर नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मात्र तत्परतेने वेळ काढत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

हेही वाचा – Kangana Ranaut: ‘जनरेशन गटर’ म्हणणाऱ्या कंगना रणौतचा मोठा युटर्न! काही दिवसांतच बदलली भूमिका, आता म्हणतात ‘जेन झी हीच…

‘भिऊ नका’ हा संदेश नक्की कोणासाठी?

दिल्लीत पार पडलेल्या राजकीय भेटींवर शंका उपस्थित करत ठाकरेंनी विचारले की, “सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असताना, उपमुख्यमंत्री दिल्लीत धाव का घेत आहेत? कोर्टाच्या निकालाच्या भीतीपोटी ही धावपळ सुरू आहे का?” पंतप्रधान ज्या प्रकारे ‘सोबत राहण्याचे’ आश्वासन देत आहेत, तो प्रकार सर्वोच्च न्यायालय, गृहमंत्री की स्थानिक नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

लोकशाही वाचवण्यासाठी देशभरात लढ्याचा नारा

हा राजकीय लढा आता केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण लोकशाही वाचवण्याचा लढा बनला आहे, असे प्रतिपादन ठाकरेंनी केले. पक्ष बदलणाऱ्यांना अभय देऊन राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीला लागलेला संसर्ग आहे. ‘आमच्याकडे या, तुमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही’ असा चुकीचा संदेश यातून दिला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांनी मिळून याविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, तसेच ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number