BJP Raj K Purohit Passes Away : भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मंत्री , मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन. मुंबई हॉस्पिटल मध्ये घेतलं अंतिम श्वास<br/>

BJP Raj K Purohit Passes Away : भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन

महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर अवघ्या काही क्षणात राजकीयवर्तूळात खळबळ उडाली, शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. असं असताना आता आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती, दरम्यान त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्य उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान वयाच्या 69 वर्षी राज के. पुरोहित यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

हेही वाचा- Chhatrapati Smabhajinagar: मतदान केंद्रावरील पोलिसांशी धक्काबुक्की पडली महागात; माजी महापौरांवर गुन्हा दाखल
राज के. पुरोहित हे दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून 1990, 1995, 1999 आणि 2004 या कालावधीत सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आले असून त्यांनी मुंबईच्या राजकारणातील वर्चस्व सिद्ध केले होते. एवढचं नव्हे तर 1995-1999 या काळात कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number