पैठणच्या राजकारणातील मोठा स्तंभ कोसळला; शरद पवारांच्या निष्ठावंत साथीदाराचं निधन

त्यांच्या जाण्याने पैठण परिसरासह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.
पैठणच्या राजकारणातील मोठा स्तंभ कोसळला; शरद पवारांच्या निष्ठावंत साथीदाराचं निधन
Chandrakant Ghodke death

पैठण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेत्या आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने पैठण परिसरासह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. शरद पवार यांच्या विचारांशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलेले एक ज्येष्ठ आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून घोडके यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर राज्यातील विविध क्षेत्रांतील राजकीय नेते आणि मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पैठण येथील सिद्धेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विधानसभेत पैठणच्या प्रश्नांना फोडली वाचा

चंद्रकांत घोडके यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पैठण तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकाऱ्यांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे अत्यंत हिरीरीने विधानसभेत मांडले. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मतदारसंघातील रस्ते, शिक्षण आणि सिंचनाच्या कामांना गती दिली. केवळ राजकारणच नव्हे, तर सहकार क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्यांनी शरद सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून कारखान्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. सहकारातील या अतुलनीय योगदानामुळेच त्यांना संपूर्ण परिसरात ‘सहकार महर्षी’ ही आदराची उपाधी मिळाली होती.

हेही वाचा – मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता; 2 बड्या मंत्र्यांना नारळ, श्रीकांत शिंदेंना मिळणार संधी?

सहकार आणि विकासाची मोठी हानी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते अगदी अलीकडच्या राजकीय घडामोडींपर्यंत चंद्रकांत घोडके हे शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय साथीदार म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामीण भागातील सहकार चळवळ टिकवून ठेवणे आणि ती समृद्ध करणे यासाठी त्यांनी हयातभर प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने पैठण तालुक्याने एक अभ्यासू मार्गदर्शक आणि लोकनेता गमावला असून, सहकार क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version