Vaibhav Naik : ‘जितके वर्ष महामार्ग रखडला तितके वर्ष टोलमाफी करावी, हीच आमच्यासाठी माफी असेल’; ठाकरे गटाच्या नेत्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आज जवळपास 14 वर्षानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग मे 2026 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन  दिले आहे. मात्र  हा महामार्ग रखडण्यास नितीन गडकरीच कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी, रायगडमध्ये महामार्गाचे काम करणारे ठेकेदार कामं अर्धवट टाकून निघून गेले. तरी त्यांना पाठीशी घालण्याचे […]

Vaibhav Naik : ‘जितके वर्ष महामार्ग रखडला तितके वर्ष टोलमाफी करावी, हीच आमच्यासाठी माफी असेल’; ठाकरे गटाच्या नेत्याची   केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आज जवळपास 14 वर्षानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग मे 2026 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन  दिले आहे. मात्र  हा महामार्ग रखडण्यास नितीन गडकरीच कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी, रायगडमध्ये महामार्गाचे काम करणारे ठेकेदार कामं अर्धवट टाकून निघून गेले. तरी त्यांना पाठीशी घालण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले. महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत  नितीन गडकरी यांनी जनतेची माफी मागितली. परंतू, ही माफी केवळ टोल वसुली करण्यासाठी मागितली आहे का?, मुंबई – गोवा महामार्ग अर्धवट स्थितीत ठेवल्याने महामार्गावर झालेल्या अपघातात हजारो कोकणवासियांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबियांना सरकार आर्थिक मदत करणार का?, 14 वर्षे हा महामार्ग अपूर्णावस्थेत ठेवल्याबद्दल नितीन गडकरी यांनी कोकणवासियांची माफी मागण्यापेक्षा कोकणवासियांना मुंबई – गोवा महामार्गावर टोलमाफी द्यावी, असे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Pratap Sarnaik: ‘ऑपरेशन टायगर 365 दिवस सुरूच राहणार…’; खासदार फुटीच्या चर्चांवर प्रताप सरनाईकांचा मोठा खुलासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number