Gokul Milk Union: गोकुळ दूध संघात मोठी उलथापालथ! प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती; हसन मुश्रीफ यांना धक्का

गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Gokul Milk Union: गोकुळ दूध संघात मोठी उलथापालथ! प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती; हसन मुश्रीफ यांना धक्का

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघांपैकी एक असलेल्या गोकुळमध्ये प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत संचालक मंडळाच्या माध्यमातून चालणाऱ्या या संघाच्या कारभारावर आता पाच अधिकाऱ्यांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ नियंत्रण ठेवणार आहे. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपली. नव्या सहकार कायद्यानुसार मुदत संपल्यानंतर जुने संचालक पुढे कार्यरत राहू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनात पोकळी निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे दुग्ध विभागाच्या उपनिबंधकांनी हा आदेश जारी केला आहे.

या नव्या प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष म्हणून साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशीचे सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, पणन विभागाचे लेखापरीक्षक सागर बलकवडे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील चंद्रकांत परळकर यांचा समावेश आहे. हे अधिकारी मिळून आता संघाचे सर्व निर्णय आणि कारभार सांभाळणार आहेत.या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. भाजप समर्थक गटातील काही नेत्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, गोकुळशी संबंधित असलेल्या प्रभावशाली नेत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात सहकार क्षेत्रातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या संघाच्या कारभारात झालेला हा बदल केवळ प्रशासनिक नसून, त्याचा परिणाम थेट शेतकरी आणि दूध उत्पादकांवर होऊ शकतो. पुढील काळात या प्राधिकृत मंडळाच्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number