शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे..पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित 21 वा हप्ता आता लवकरच येणार आहे. दिवाळीनंतर थेट तुमच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. लाखो शेतकरी कुटुंबांना या दिवाळी सणाला हा हप्ता फायदेशीर ठरेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीचे अर्ज किंवा ई-केवायसी न केल्यास हप्ता अडकू शकतो.
आता 21 वा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. एका दाव्यानुसार, 1 नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. अद्याप केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही अथवा त्याविषयीची माहिती सुद्धा दिलेली नाही.
हेही वाचा - Maharashtra Flood Relief Fund: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, नुकसान भरपाईच्या वितरणास सुरुवात
अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे.
हेही वाचा - PM Kisan Yojana 21st Installment: दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील जवळपास 31.01 लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे. कारण यामध्ये पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.