Tuesday, November 11, 2025 09:46:32 PM

Nanded Mumbai Flight: नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून सुरू होणार मुंबई-गोवा थेट विमानसेवा

‘स्टार एअर’ ही कंपनी या दोन्ही मार्गांवर दररोज उड्डाणे करणार असून, प्रवासाचा वेळ अवघा एक तास इतका असणार आहे.

nanded mumbai flight नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी  या दिवसापासून सुरू होणार मुंबई-गोवा थेट विमानसेवा

Nanded Mumbai Flight: मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नांदेड ते मुंबई आणि गोवा दरम्यानची विमानसेवा अखेर 15 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ‘स्टार एअर’ ही कंपनी या दोन्ही मार्गांवर दररोज उड्डाणे करणार असून, प्रवासाचा वेळ अवघा एक तास इतका असणार आहे.

मुंबईसाठी थेट उड्डाण 

नांदेड- मुंबई विमानसेवेसाठी सुरुवातीला नवी मुंबई विमानतळाचा विचार करण्यात आला होता. मात्र माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी या उड्डाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मुंबई) स्लॉट देण्याची मागणी केली होती. ही मागणी केंद्राने मान्य केल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. चव्हाण म्हणाले, 'नांदेड आणि मराठवाड्यातील नागरिकांना मुंबई व गोवा यांच्याशी वेगवान संपर्क मिळावा हा उद्देश साध्य झाला आहे. ही सेवा सातही दिवस सुरू राहील.' 

हेही वाचा - Nagpur NCP Office Lavani Dance: नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांकडून जोरदार टीका

उड्डाणांचे वेळापत्रक

मुंबई - नांदेड विमान दुपारी 4:45 वाजता मुंबईहून उड्डाण करेल व 5:55 वाजता नांदेडला पोहोचेल.
नांदेड - मुंबई परतीचे उड्डाण सायं. 6:25 वाजता होईल व 7:35 वाजता मुंबईत लँड होईल.
गोवा - नांदेड विमान गोव्याच्या मोपा विमानतळावरून 12:00 वाजता उड्डाण घेईल आणि 1:00 वाजता नांदेडला पोहोचेल.
नांदेड - गोवा परतीचे उड्डाण 1:30 वाजता होऊन 2:40 वाजता गोव्याला पोहोचेल.

हेही वाचा - Uddhav Thackeray : 'अनाकोंडा' म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर डागली तोफ; निवडणूक आयोगालाही थेट इशारा! निर्धार मेळाव्यात घणाघात

पर्यटन व व्यावसायिक संपर्काला चालना

या नव्या विमानसेवेच्या प्रारंभामुळे नांदेडकरांना मोठा दिलासा मिळणार असून, गोवा मार्गामुळे पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला विशेष गती मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई मार्गामुळे व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रवास सुलभ होणार आहे. नांदेडहून सध्या दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. आता मुंबई आणि गोवा मार्गांचा समावेश झाल्याने एकूण सात गंतव्यस्थाने हवाई मार्गाने जोडली जाणार आहेत. या सेवेमुळे नांदेडसह परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदगाव परिसरातील नागरिकांनाही थेट फायदा होणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री