Mumbai Pune Bullet Train: पुणे-मुंबई अंतर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर; राज्याला मिळाल्या 2 नव्या बुलेट ट्रेन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलेला असतानाच, आता केंद्र सरकारने राज्यातील आणखी 2 महत्त्वाच्या मार्गांवर हाय-स्पीड बुलेट ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली आहे.

Mumbai Pune Bullet Train: पुणे-मुंबई अंतर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर; राज्याला मिळाल्या 2 नव्या बुलेट ट्रेन

Mumbai Pune Bullet Train: महाराष्ट्रातील दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलेला असतानाच, आता केंद्र सरकारने राज्यातील आणखी 2 महत्त्वाच्या मार्गांवर हाय-स्पीड बुलेट ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीमुळे पुणे, मुंबई आणि हैदराबादमधील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नव्या प्रकल्पामुळे राज्याच्या दळणवळण नकाशात मोठे बदल होणार असून दळणवळणाची गती वाढणार आहे.

प्रवासाचा वेग वाढणार, वेळ वाचणार 
नव्या प्रस्तावानुसार, मुंबई-पुणे आणि पुणे-हेदराबाद या 2 मार्गांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर आयटी (IT) आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. प्रवासाच्या वेळेत होणारी कपात खालीलप्रमाणे आहे:

मुंबई ते पुणे: सध्या 3 ते 4 तास लागणारा हा प्रवास आता फक्त 48 मिनिटांत पूर्ण होईल.
पुणे ते हैदराबाद: हे लांब पल्ल्याचे अंतर केवळ 2 तासांत कापता येणार आहे.
लोकलचा कायापालट: मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 3000 कोटींचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले असून, 238 नव्या स्वयंचलित दरवाजांच्या गाड्यांची निर्मिती सुरू आहे.

नागपूर-मुंबई मार्ग अद्याप अधांतरी?
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा मात्र लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. नव्या घोषणेत पुणे आणि हैदराबाद मार्गावर भर दिल्याने विदर्भातील नागरिकांकडून "आमच्या मार्गाचे काय?" असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समृद्धी महामार्गामुळे रस्ते प्रवास सुसाट झाला असला, तरी लोहमार्गावरील बुलेट ट्रेनसाठी नागपूरकरांना आता आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Mumbai BEST Bus Service: सणासुदीत मुंबईकरांचा आनंद द्विगुणित होणार; गर्दीसाठी 'बेस्ट' सेवा सज्ज, 150 जादा बसेस धावणार

समुद्राखालील बोगद्याचे काम युद्धपातळीवर
भारतातील रेल्वे तंत्रज्ञानाचा चमत्कार मानला जाणारा 21 किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा आता वास्तवात येत आहे. या प्रकल्पाचा प्रगती अहवाल समाधानकारक असून, 7 किमीच्या मुख्य बोगद्यापैकी 5 किमीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तसेच मार्गातील 17 नद्यांवरील पुलांचे बांधकामही प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे हा प्रकल्प लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी चिन्हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number