Wednesday, July 09, 2025 08:32:02 PM

अपहरणाचा प्रयत्न पण आजीमुळे वाचला जीव

मानकापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत 27 जुन रोजी पहाटेच्या शांततेत घडलेली एक थरारक घटना नागरिकांच्या असुरक्षिततेची जाणीव करून देणारी ठरली आहे.

अपहरणाचा प्रयत्न पण आजीमुळे वाचला जीव

तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: मानकापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत 27 जुन रोजी पहाटेच्या शांततेत घडलेली एक थरारक घटना नागरिकांच्या असुरक्षिततेची जाणीव करून देणारी ठरली आहे. 27 जूनच्या पहाटे एका 5 वर्षीय बालिकेचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुदैवाने, सतर्क आजीच्या उपस्थितीमुळे आरोपीचा हा प्रयत्न अपयशी ठरला. श्रवणकुमार शिवराम यादव असे अटक आरोपीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

घटनेच्या दिवशी पीडित 5 वर्षीय बालिका आपल्या आजीसोबत घरात झोपली होती. मात्र, दरवाजा बंद असूनही आरोपी श्रवणकुमार याने घराच्या दरवाज्यात हात घालून दार उघडले आणि घरात प्रवेश करत थेट 5 वर्षीय बालिकेपर्यंत पोहोचला आणि तिला उचलून घेऊन जाऊ लागला. यादरम्यान, कशाची तरी चाहुल लागून जेव्हा आजी अचानक जागी झाली, तेव्हा तिने पहिले की एक अज्ञात आरोपी आपल्या नातीला उचलून नेत आहे. तेव्हा आजीने जोरात आरडाओरड सुरू केल्याने आरोपी घाबरला आणि बालिकेला घरातच सोडून फरार झाला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

55 सीसीटीव्ही फुटेज तपासले

सदर महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या उद्देशाने घरात घुसखोरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताचं मानकापूर पोलिसांनी तत्काळ परिसरातील 55 सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली आणि सापळा रचून आरोपी श्रवणकुमार शिवराम यादव याला बेड्या ठोकल्या आहे. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबुल केला आहे.


सम्बन्धित सामग्री