Wednesday, June 25, 2025 01:25:16 AM

भुजबळ मंत्रिपदाचा पदभार स्विकारतील याचा आनंद; भुजबळांच्या मंत्रिपदावर मंत्री बावनकुळेंचे भाष्य

छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भुजबळांच्या मंत्रिपदावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

भुजबळ मंत्रिपदाचा पदभार स्विकारतील याचा आनंद भुजबळांच्या मंत्रिपदावर मंत्री बावनकुळेंचे भाष्य

मुंबई : छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भुजबळांच्या मंत्रिपदावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. नगरसेवक ते उपमुख्यमंत्रीपदावर त्यांनी सरकारमध्ये यशस्वीपणे काम केलं असल्याची प्रतिक्रिया मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. 

गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यात भुजबळ यांना कोणतेही मंत्रिमंद मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात संवेदनशीलता निर्माण करणं गरजेचं; मनसे नेते अमित ठाकरेंचे मोदींना पत्र

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? 
छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी सरकारमध्ये यशस्वीपणे काम केलं आहे. मला तिने नेत्यांचे अभिनंदन करायचे आहे की त्यांनी छगन भुजबळांसारख्या महत्त्वाच्या आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळात संधी दिली असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना, छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारतील याचा आनंद आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी साजेस काम छगन भुजबळ करतील असा विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री