Rohit Pawar On Ashok Kharat: ‘हवाला, दुबई कनेक्शन अन् भ्रष्ट नेते…’; खरात प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

खरात नावाचा हा कथित भोंदू केवळ अंधश्रद्धा पसरवत नसून, तो एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar On Ashok Kharat: ‘हवाला, दुबई कनेक्शन अन् भ्रष्ट नेते…’; खरात प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar On Ashok Kharat: नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. खरात नावाचा हा कथित भोंदू केवळ अंधश्रद्धा पसरवत नसून, तो एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे ऑस्ट्रेलिया आणि दुबईसारख्या देशांशी जोडलेले असून यात मोठ्या प्रमाणावर ‘मनी लाँड्रिंग’ झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

हवाला मार्फत हजारो कोटींची अफरातफर?
रोहित पवार यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवर पोस्ट करत खरातवर निशाणा साधला. “भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार-पाच देशांत हवालाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money Laundering) करत असल्याची माहिती समोर येत आहे. खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक हजार कोटींहून अधिक रुपये या देशांमध्ये पाठवले असल्याचे कळते,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हा केवळ एका भोंदू बाबाचा प्रश्न नसून हे एक मोठे आर्थिक ‘नेक्सस’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न; केंद्रीय यंत्रणांकडे मागणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, रोहित पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. हा विषय केवळ आर्थिक गुन्ह्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणाचा वापर राजकीय गोळाबेरजेसाठी किंवा सत्तेच्या समीकरणांसाठी न करता, सखोल चौकशी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Sanjay Gaikwad VS Anjali Damania : ‘शिंदेंवर आरोप करुन मोठेपणा घेणं बंद करा’; संजय गायकवाडांचा दमानियांना टोला

“ED ला जाग येईल का?”
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “या प्रकरणात तरी ED (अंमलबजावणी संचालनालय) सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा आहे,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली. आता या गंभीर आरोपांनंतर राज्य पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number