Maharashtra Rain : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! लोकलसेवा पूर्णपणे ठप्प, तर शाळांनाही सुट्टी जाहीर; मुंबईत काय स्थिती?

पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Maharashtra Rain : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! लोकलसेवा पूर्णपणे ठप्प, तर शाळांनाही सुट्टी जाहीर; मुंबईत काय स्थिती?

पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता. पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. उमरगाम–घोलवड विभागात रेल्वेमार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे बंद आहेत. तसेच अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.

आज जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच यावेळी प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी, आवश्यक असल्यासच प्रवास करावा, रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आलं आहे. आजही पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाची बॅटिंग! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; नागरिकांना महत्वाच्या सूचना

रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

 

मध्य रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने

हार्बर रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने

 पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार दरम्यान ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत

रद्द गाडी
93002 दहानू रोड–चर्चगेट (23 जुलै)

अल्प मार्गावर समाप्त /  अल्प मार्गावर सुरू

09723 जयपूर–बांद्रा टर्मिनस : वापीपर्यंत.
09724 बांद्रा टर्मिनस–जयपूर : वापीहून सुरू.
09052 भुसावळ–दादर : भिलाडपर्यंत.
19015 दादर–पोरबंदर : भिलाडहून सुरू.
93001 विरार–दहानू रोड : वाणगावपर्यंत.
93004 दहानू रोड–चर्चगेट : वाणगावहून सुरू.
93201 विरार–दहानू रोड : बोरपर्यंत.
93202 दहानू रोड–चर्चगेट : बोरहून सुरू.

पुनर्नियोजित गाड्या

22953 मुंबई सेंट्रल–अहमदाबाद : 05:40 ➜ 06:40
22975 बांद्रा टर्मिनस–रामनगर : 05:10 ➜ 06:30
20901 मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल : 06:00 ➜ 07:00
12009 मुंबई सेंट्रल–अहमदाबाद : 06:20 ➜ 07:30

वळविण्यात आलेल्या गाड्या

12218 चंदीगड–तिरुवनंतपुरम : सुरत–पालधी–जळगाव मार्गे.
22908 हापा–मडगाव : सुरत–पालधी–जळगाव मार्गे.
09627 अजमेर–सुरत : सुरत–पालधी–जळगाव मार्गे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number