Wednesday, November 19, 2025 02:03:54 PM

Gopichand Padalkar's Controversial Statement: 'हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये...'; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

बीड जिल्ह्यात आयोजित एका सार्वजनिक सभेत बोलताना पडळकर यांनी हिंदू मुलींना जिममध्ये जाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

gopichand padalkars controversial statement हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

Gopichand Padalkar's Controversial Statement: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बीड जिल्ह्यात आयोजित एका सार्वजनिक सभेत बोलताना पडळकर यांनी हिंदू मुलींना जिममध्ये जाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, 'हिंदू मुलींनी जिममध्ये जाण्याऐवजी घरी योगाभ्यास करावा, कारण जिममध्ये कोण प्रशिक्षण देत आहे आणि तिथे कोणते षड्यंत्र रचले जात आहे, हे आपल्याला ठाऊक नसते.' 

पडळकर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या भाषणात एका विशिष्ट समुदायाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत दावा केला की काही लोक हिंदू मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पालकांनी आणि मुलींनी सावध राहावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - नाशिकमध्ये पहिल्यांदाच तेजस MK-1A लढाऊ विमानाचे उड्डाण; राजनाथ सिंह म्हणाले, 'माझी छाती अभिमानाने फुलून येते'

पडळकर यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांची ओळख पडताळणी होणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे योग्य ओळखपत्र नाही, अशा तरुणांना कॉलेज परिसरात प्रवेश देऊ नये.' त्यांनी यासाठी कठोर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणीही केली.

हेही वाचा - Diwali 2025: सावधान! मिठाईत होतेय भेसळ, दोन महिन्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता  

दरम्यान, पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. अनेकांनी त्यांच्यावर समाजात फूट पाडण्याचा आरोप केला आहे. दरम्यान, भाजप नेते मात्र या वक्तव्यावर औपचारिक प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे वक्तव्य राज्यात नवा राजकीय वाद निर्माण करू शकते.
 


सम्बन्धित सामग्री