Pune Bus Accident : नियंत्रण सुटलं अन् भरधाव बस थेट फुटपाथवर! 5 जणांना चिरडलं तर दोन भावंडांचा जागीच मृत्यू

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात, खुन अशा अनेक बातम्या कानावर पडत आहेत. अशातच पुण्यातील पिंपरी - चिंचवडमधील, हिंजवडी आयटी परिसरात एका भरधाव बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.

Pune Bus Accident : नियंत्रण सुटलं अन् भरधाव बस थेट फुटपाथवर! 5 जणांना चिरडलं तर दोन भावंडांचा जागीच मृत्यू

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात, खुन अशा अनेक बातम्या कानावर पडत आहेत. हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांवर नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशातच पुण्यातील पिंपरी – चिंचवडमधील, हिंजवडी आयटी परिसरात एका भरधाव बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन शाळकरी भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड रस्त्यावर, पंचरत्न चौकात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती बस थेट फुटपाथवर चढली, ज्यामुळे फुटपाथवर चालत असणाऱ्या नागरिकांना बसने जोरात धडक दिली. यामध्ये अर्चना देवा प्रसाद , सूरज देवा प्रसाद आणि प्रिया देवा प्रसाद गंभीर जखमी झाले असून बसमधील काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत.

हेही वाचा- Shirur Accident: शिरूर हादरलं! आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीची 4 वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक; प्रकृती गंभीर

या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली, जी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वाकड आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती कळताच हिंजवडी पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहचले असून गर्दी हटवण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील रस्ते अपघातांचं सत्र सातत्यानं सुरुच आहे. पुण्यातील नवले पुलावरील 13 नोव्हेंबरच्या अपघाताची घटना ताजी असतानाच  पिंपरी – चिंचवडच्या हिंजवडीमध्ये भरधाव बस फुटपाथवर चढली.  यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number