राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अपघातामागील कारण जाणून घेण्यासाठी कसून तपास सुरु आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट संशय व्यक्त केला. तसेच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत थेट अजित पवार यांच्या निधनानंतर मोठा संशय व्यक्त केला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी खासगी गुप्तहेर संस्थेकडून केली जात असल्याचीही माहिती पुढे आली. त्यानंतर आज रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल मोठी माहिती दिली आहे.
हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash Update: अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर्सवर आगीचा परिणाम; परदेशातील तंत्रज्ञांच्या मदतीने उलगडणार विमानातील शेवटच्या क्षणांचं सत्य
यावेळी रोहित पवार म्हणाले की, "टीव्हीवरुन मला ही बातमी कळली. ज्या 35 आमदारांनी सुनेत्राकाकींच नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर केलं, त्यांचे मी आभार मानतो. त्याशिवाय त्या पक्षाचे 32 ते 35 महत्त्वाचे पदाधिकारी, त्यांनी सुद्धा कागदावर सुनेत्राकाकींच नाव स्पष्टपणे जाहीर करत लिहिलं होत. त्या पक्षातील आमदार, पदाधिकारी सर्व सुनेत्राकाकींसोबत आहेत, मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत हीच आमची देखील इच्छा आहे".
पुढे विलिनीकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले की,"विलिनीकरणावर तेच जास्त चर्चा करत आहेत. आमदारांना बोलवतात बसवतात आणि बाहेर जाऊन विलिनीकरणावर बोलू नका असं म्हणतात. त्याच गोष्टीच मला आश्चर्य आहे. अजित दादा असताना त्यांच्यासोबत काय चर्चा झाली हे आम्हाला माहित आहे. अजित दादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आणि आमच्यामध्ये झालेली चर्चा आहे. आज दादा नाहीयेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौन आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की दादा गेल्यानंतर लगेच आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षा पक्षामध्ये राहावं आणि ते पवार साहेबांना सुप्रिया ताईंना आम्हाला तिथे विरोध करतायत आणि विरोध करतात म्हणून त्यांच महत्त्व आहे, त्यांच महत्त्व टिकावं म्हणून ते हा विषय स्वतःच काढतायत.."
हेही वाचा- Sanjay Raut On Ajit Pawar: 'दादांची फाईल बंद करण्यास अमित शाहांचा नकार'; अजित पवार यांच्या निधनावर संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
"जर त्यांना खरचं दादा भेटले होते तर सोपा विषय आहे, दादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील यांच्या घरी भेटायचे. त्यांच्या घरासमोर लोढांच घर आहे. त्यांच्या घरा बाहेरील सीसीटीव्ही फुटेज चेक करा म्हणजे कळेल दादा 13 वेळा भेटले की 14 वेळा भेटले ते... आता विषय इतकाच आहे की, ब्लॅक बॉक्स जळला कसा आणि तो भारताच्या बाहेर पाठवला गेला. हा जो काही विषय आहे, तो महत्वाचा आहे. अनेक लोक म्हणतात की, म्हणतात की, तुम्ही विलिनीकरणाबाबत प्रेस घेणार होतात. आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण दुय्यम आहे. आज कुठल्या गोष्टीला महत्व आहे तर दादांच्या तपासाला, या गोष्टीवर आम्ही फोकस करून आहोत. आता विषय कोणता महत्वाचा आहे तर तो अपघाताचा. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, बैठका घेऊ शकतो, प्रेस घेऊन तुमच्यासमोर सगळे आणू शकतो. आमच्याकडे पुरावे आहेत. अपघाताची चौकशी होणे हेच महत्वाचे आणि यावरच आमचा फोकस आहे".