Kishori Pednekar On Sheetal Mhatre: ‘दांडा फेम बाईंना बक्षिसे कशी मिळाली?’; किशोरी पेडणेकरांचा शीतल म्हात्रेंवर जोरदार पलटवार

म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना पेडणेकर यांनी 'जोगेश्वरीच्या मातोश्री'चा उल्लेख करत खोचक शब्दांत टोलेबाजी केली.

Kishori Pednekar On Sheetal Mhatre: ‘दांडा फेम बाईंना बक्षिसे कशी मिळाली?’; किशोरी पेडणेकरांचा शीतल म्हात्रेंवर जोरदार पलटवार

Kishori Pednekar On Sheetal Mhatre: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शीतल म्हात्रे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना पेडणेकर यांनी ‘जोगेश्वरीच्या मातोश्री’चा उल्लेख करत खोचक शब्दांत टोलेबाजी केली. “ज्यांनी 2022 मध्ये गद्दारी केली, त्यांना आता खासदारकी, आमदारकी आणि महापालिकेची बक्षिसे मिळत आहेत, हे कोणाच्या कृपेने सुरू आहे?” असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.

जोगेश्वरीच्या ‘मातोश्री’वरून निशाणा
किशोरी पेडणेकर यांनी शीतल म्हात्रे यांचा उल्लेख ‘दांडा फेम बाई’ असा करत त्यांच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “या बाईंची सलगी जोगेश्वरीच्या ‘मातोश्री’शी जास्त आहे आणि तिथूनच त्यांना राजकीय बक्षिसे मिळत आहेत. 2024 मध्ये त्यांना मिळालेली उमेदवारी आणि सध्याचा खासदारकीचा ड्रामा पाहता, त्यांची सुई नक्की कुठे आहे हे स्पष्ट होते.” उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर टीका करणाऱ्यांनी स्वतःची मर्यादा ओळखावी, असा इशाराही त्यांनी दिला.

ओरिजनल व्हिडिओ आणि नैतिकतेचा प्रश्न
शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर बोलताना पेडणेकर यांनी विचारले की, “लोक अजूनही तो ओरिजनल व्हिडिओ मागत आहेत, तो आधी दिला पाहिजे.” नीलम गोरे आणि शीतल म्हात्रे यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, सुषमा अंधारे यांच्या सारख्या नेत्यांनी ज्या पद्धतीने जिल्हा सर केला आहे, ते पाहून या ‘चौथाळ’ बाईंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मूळ विषयाला बगल देण्यासाठीच ठाकरे कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

खरात आणि पाण्याचा वाद: ’12 गावचे पाणी प्यायलेल्यांची’ भाषा
पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना पेडणेकर यांनी सांगितले की, पाणी ही मूलभूत गरज आहे. “एखाद्या कैद्याने पाणी मागितले तरी जेलरला ते द्यावे लागते. पण पाण्याचा विषय काढून गुन्हे लपवण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा सवाल त्यांनी केला. खरात यांच्याशी असलेल्या संबंधांवरून म्हात्रे यांच्यावर टीका करताना पेडणेकर म्हणाल्या, “घाट-घाटचे पाणी प्यायलेली महिलाच अशा प्रकारची भाषा वापरू शकते, एखादी सुसंस्कृत महिला नाही.”

हेही वाचा – Sushma Andhare: ‘संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांमधील तणावाच्या बातम्या म्हणजे…’; सुषमा अंधारेंचा भाजप आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

शस्त्र परवाना 
या संपूर्ण वादात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत पेडणेकर यांनी विचारले की, ज्या शस्त्र परवान्याचे नूतनीकरण 2024 मध्ये झाले, त्यावर कोणीही का बोलत नाही? राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वतःच्या भ्रष्टाचारावर आणि गुन्ह्यांवर पांघरूण घालू नये. “झाकली मूठ लाखाची ठेवा, अन्यथा ती उघडली तर काय बाहेर येईल हे सर्वांना माहित आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी म्हात्रे यांना सुनावले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number